S M L

चिनी शेअर बाजाराचे पडसाद, सेन्सेक्स 485 अंकांनी घसरला

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2015 05:55 PM IST

चिनी शेअर बाजाराचे पडसाद, सेन्सेक्स 485 अंकांनी घसरला

08 जुलै : भारतीय शेअर बाजारात आज (बुधवारी) मोठी घसरण झालीये. मुंबई शेअर बाजार जवळ जवळ 485 अंकांनी घसरलाय तर राष्ट्रीय शेअर बाजार देखील 2 टक्क्यानी घसरलाय. चिनी शेअर बाजारात आज झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आशियाई देशांच्या शेअर बाजारावर झालाय.

चिनी शेअर बाजार 12 जूनपासून विक्रीच्या दबावाखाली आहेत. गेल्या महिन्याभरात चिनी शेअर बाजार 30 टक्याहून जास्त खाली आलेत .भारतीय बाजारात आज मुख्यता बँक आणि धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये ही घसरण दिसून आलीय. आज झालेली घसरण ही या महिन्यातली सर्वात मोठी घसरण असून यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 28000 च्या खाली गेलाय. तर निफ्टी 8400 च्या खाली गेलाय. यस बँक, टाटा मोटार्स, एचडीएफसी या शेअर्स मध्ये 8 टक्क्याहून अधिक घसरण झालीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2015 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close