S M L

राकेश मारिया यांनी दिला राजीनाम्याचा इशारा

27 नोव्हेंबर शहीद अशोक कामटेंच्या पत्नी विनिता कामटेंनी केलेल्या आरोपांना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच उत्तर द्यावं. नाही तर मी राजीनामा देईन, असा इशारा जॉईंट कमिशनर राकेश मारिया यांनी दिला आहे. 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या मृत्यूवरून अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. हल्ल्याच्या वेळी पोलीस कंट्रोल रुमचं नियंत्रण करणारे आणि शहीद कामटे, साळसकर, करकरेंच्या संपर्कात असणारे राकेश मारिया यांच्यावर विनिता यांनी 'टू द लास्ट बुलेट' या पुस्तकातून थेट आरोप केलेत. मारियांनीच या अधिकार्‍यांना कामा हॉस्पिटलकडे जायला सांगितलं. या अधिकार्‍यांनी वारंवार मागणी करूनही अतिरेक्यांशी लढण्यासाठी त्यांना वेळेवर कुमक मिळाली नाही, तसंच अतिरेक्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर 40 मिनिटे या अधिकार्‍यांना कसलीही मदत मिळाली नाही. या सर्व प्रकाराविषयी राकेश मारिया गप्प का? असा प्रश्न विनिता कामटे यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. विनिता कामटे यांच्या याच आरोपांमुळे राकेश मारिया यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. मारिया यांचं कोणतही पत्र मिळालं नसल्याचं आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पोलीस खात्यात मतभेद निर्माण होतील असं वक्तव्य कोणीही करु नये असंही आर. आर. पाटील यांनी म्हटलं आहे. तर मुंबई पोलीस खात्यात मतभेद नाहीत असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी दुपारी राकेश मारिया यांनी राज्याचे गृहसचिव चंद्रा अय्यंगार यांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2009 01:21 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2009 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close