S M L

गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2015 10:31 PM IST

Uddhav tahcak08 जुलै : मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून मुंबईत कोणत्याही विघ्नाविना गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाईल असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. मुंबई हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी सण-उत्सव साजरे करण्यास मनाई केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली. एकीकडे युतीमध्ये सध्या चांगलीच चढाओढ सुरू आहे. 'सामना'च्या अग्रलेखाच्यानिमित्ताने आज सकाळीसुद्धा त्याची झलक बघायला मिळाली. तर संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवास्थानी जाऊन भेट घेतली. हायकोर्टाने मुंबईच्या रस्त्यांवर उत्सव साजरे करायला मनाई केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे यासाठी कायद्यांमध्ये बदल करण्यात येईल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितलंय.

त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी ही भेट घेतली. ही बैठक सकारात्मक झाल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या मार्गातले अडथळे दूर होतील, अशी आशाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. पण या बैठकीत काही राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली का, याविषयी काही सांगण्यात आलेलं नाही. या भेटीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या दालनात जाऊन सुमारे 10 मिनिटं चर्चा केली. पण त्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2015 10:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close