S M L

FTIIच्या प्रमुखपदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असावं- रणबीर कपूर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 9, 2015 12:30 PM IST

FTIIच्या प्रमुखपदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असावं- रणबीर कपूर

09 जुलै : 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादात बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने उडी घेत विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेतर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडिओकिल्पमध्ये रणबीरने आपली मतं स्पष्टपणे मांडली आहेत. या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. तसंच विद्यार्थी आणि सरकारमध्ये सुसंवादाची आवश्यकता असल्याचे रणबीर कपूरने म्हटलं आहे.

एफटीआयआय ही चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींना घडवणारी संस्था आहे. चित्रपट क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या देशभरातील अनेकांना या संस्थेमुळे संधी मिळते. एफटीआयआयमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांविषयी बाहेरच्या जगात आदर आहे. पण गेल्या काही दिवसांपासून संस्थेविषयी अनेक नकारात्मक गोष्टी कानावर पडत आहेत. विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध संस्थेचा अध्यक्ष नेमण्यात आला आहे.

माझ्या मते याबाबतीत विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. एफटीआयआयसारख्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेरणादायी व्यक्तीमत्व असावं, एवढीच त्यांची मागणी आहे. संस्थेच्या मोठेपणाचा मुद्दा बाजुला ठेवला तरी, विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडून प्रेरणा घेता येईल, अशी व्यक्ती एफटीआयआयच्या अध्यक्षपदावर नेमावी, असं मत रणबीरने व्यक्त केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2015 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close