S M L

प्रतिमा मलीन होऊ देऊ नका, शहांनी दिल्या कानपिचक्या

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2015 07:48 PM IST

प्रतिमा मलीन होऊ देऊ नका, शहांनी दिल्या कानपिचक्या

08 जुलै : स्वतःची प्रतिमा मलीन होऊ देऊ नका, त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होतो अशा कानपिचक्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या. तसंच जनतेचा विश्वास टिकवून ठेवा, महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची इच्छा ठेवा असा सल्लाही अमित शहांनी पक्षाच्या नेत्यांना दिलाय.

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या बोगस पदवी प्रकरणामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली होती. विरोधकांनी फडणवीस सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहे. आज अमित शहांच्या हस्ते मुंबईत महासंपर्क अभियानाच्या पुढच्या टप्प्याला सुरवात झालीये. त्यावेळी शहांनी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेऊन त्यांची झाडाझडती घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदी देश उभारणीचं काम करत आहेत, जास्त काळ पक्षाची सत्ता टिकली पाहिजे याची काळी घ्या, वाद टाळण्याचा प्रयत्न करा असंही त्यांनी नेत्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांची मानसिकता सोडावी, भाजप दीर्घ काळ सत्तेत राहणार असं  शहा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पाठिंबा घेऊन सत्ता आली याची खंतही व्यक्त केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2015 07:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close