S M L

पहिल्या व्यापार मेळ्याचं यजमानपद घेण्याची भारतानं दाखवली तयारी

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2015 09:36 PM IST

पहिल्या व्यापार मेळ्याचं यजमानपद घेण्याची भारतानं दाखवली तयारी

09 जुलै : ब्रिक्सच्या पहिल्या व्यापार मेळाव्याचं यजमानपद घ्यायला भारताला आवडेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.रशियामधल्या उफा इथं आजपासून ब्रिक्स राष्ट्रांची शिखर परिषद सुरू झालीये.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. 21 जून रोजी साजर्‍या झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले, तसंच ब्रिक्स देशांमध्ये अपारंपरिक आणि हरित ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, त्यासाठी विशेष योजना आखाव्यात अशी सूचनाही मोदी यांनी केली. यावेळी सर्व राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या राष्ट्रभाषेतून भाषण केलं. या परिषदेला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा, ब्राझिलच्या अध्यक्ष दिल्मा रौसेफ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन या परिषदेला उपस्थित आहेत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2015 09:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close