S M L

विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे

Samruddha Bhambure | Updated On: Jul 10, 2015 02:00 PM IST

विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे

10 जुलै : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमानमध्ये होत असलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे.

5 आणि 6 सप्टेंबरला हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी आज (शुक्रवारी) दिली आहे.

डॉ. शेषराव मोरे लिखाणाची सुरुवातच सावरकरांवरील लिखाणापासून झाली. 1988 मध्ये सावरकरांच्या विचारांचा चिकित्सक अभ्यास हे त्यांचं पहिलं पुस्तक आलं. तसंच, मुस्लिम मनाचा शोध आणि 1947: काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? ही त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत.

डॉ. शेषराव मोरे यांची पुस्तकं

  • सावरकरांच्या विचारांचा चिकित्सक अभ्यास
  • सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद
  • अप्रिय पण...
  • विचारलकह
  • 1857 चा जिहाद
  • मुस्लिम मनाचा शोध
  • 1947: काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?
  • काश्मीर: एक शापित नंदनवन
  • प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्श खलिफा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close