S M L

'महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा'

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 05:04 PM IST

cm meet pm modi410 जुलै : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीये. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहलंय.

महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान समाजसुधारक होते. शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. त्यांचे जीवन हे लोकसंघर्षाची प्रेरणाच होते. सर्वांना शिक्षणाची संधी, जातीप्रथेचे निर्मुलन, कृषी विकास, महिला आमि विधवांचे सबलीकरण यासाठीच्या लढ्याचे महात्मा फुले हे प्रतीक बनले होते, असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलंय. देशामध्ये स्री शिक्षणाचा पाया रचणार्‍या सावित्रीबाई फुले यांना त्यासाठीचे मोठे श्रेय जाते. महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी महिलांमध्ये जागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचे निर्मुलन यासाठी महान कार्य केले. विधवांचे पुनर्वसन, बालकल्याण, वंचितांच्या उत्थानासाठी त्यांनी अविरत कार्य केले. पुणे आणि परिसरात प्लेगची साथ आलेली असताना त्यांनी केलेल्या सेवाकार्याला तोड नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे असामान्य कार्य विचारात घेऊन भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळण्यास ते योग्य आहेत. त्यांना ही उपाधी देऊन सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close