S M L

मोदींमध्ये पाकला धडा शिकवण्याची धमक -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 06:29 PM IST

मोदींमध्ये पाकला धडा शिकवण्याची धमक -उद्धव ठाकरे

10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलीये. पाकसोबत चर्चा होते हे खेदजनक आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच पाकिस्तान वारंवार भारतीय सीमेवर आक्रमणं करतोय. त्यामुळं पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं आणि हे करून दाखवण्याची मोदीमध्ये धमक आहे अशा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

रशियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट झाली. यावेळी पंतप्रधानांनी पाकला येण्याचं निमंत्रणही स्वीकारलं. या भेटीवर भारतात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. एनडीएचा घटक पक्ष शिवसेनेनं या भेटीवर नाराजी व्यक्त केलीये. जोपर्यंत पाकिस्तान अतिरेकी कारवाया, घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करणं म्हणजे शहिदांचा अपमान आहे, असं परखड मत सेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पाकला धडा शिकवण्याचं भाष्य केलंय. आज परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे. आणि बदल घडवून आणण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहे. लवकरच हा बदल घडावा अशी सर्वांची आशा आहे. पाकसोबत चर्चा करण्याची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आजही चालू आहे असं खेदाने म्हणावं लागतंय अशी नाराजी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

तसंच आता पाकला जशाच तसं उत्तर देणं गरज आहे. मध्यंतरी म्यानमारमध्ये घुसून अतिरेक्यांचा फडशा पाडण्यात आला होता. त्यामुळे एक हिंमत आली होती. त्यामुळे आता पाकिस्तानला सुद्धा धडा शिकवू शकतो. पण, ते अजूनही काही घडले नाही ते लवकर घडावं आणि मोदी ते करून दाखवतील असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close