S M L

ISLच्या लिलावात सुनील छेत्रीला तब्बल 1 कोटी 20 लाखांची बोली

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 07:27 PM IST

ISLच्या लिलावात सुनील छेत्रीला तब्बल 1 कोटी 20 लाखांची बोली

10 जुलै : आयएसएल अर्थात इंडियन सुपर लिगच्या दुसर्‍या सीझनला लवकरच सुरुवात होतेय. आज (शुक्रवारी) मुंबईत दुसर्‍या सीझनचा लिलाव रंगतोय. आयएसएलच्या दुसर्‍या सीझनमध्ये 10 भारतीय फुटबॉलपटूंवर मोठी बोली लागलीये. भारताचा कॅप्टन सुनील छेत्री हा या लिलावातील स्टार प्लेअर ठरलाय. सुनील छेत्रीला मुंबई सिटी एफसीनं तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतलंय.

तर साडे सत्तावीस लाख बेस प्राईज असलेल्या युगनसन लिंगडोहला पुण्याच्या टीमनं 1 कोटी 5 हजारांना विकत घेतलंय. मिडफिल्डर थॉई सिंगला चेन्नईच्या टीमनं 86 लाखांना विकत घेतलंय. पुण्यानं या लिलावात मोठ्या बोली लावल्या.

जॅकिचंद सिंगलाही पुण्यानं 45 लाखांत विकत घेतलं. तर भारताचा स्ट्रायकर रॉबीन सिंगला दिल्लीनं 51 लाखांना आपल्या टीममध्ये घेतलंय. तर रिनो अँटोला त्याच्या बेस ब्राईजच्या तब्बल पाचपट बोली मिळाली. ऍटलेटिको कोलकात्यानं त्याला तब्बल 90 लाखांत विकत घेतलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 07:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close