S M L

नाईट मार्केट हा बाजारुपणा, सेनेचा भाजपवर पलटवार

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 10:09 PM IST

uddhav-on-fadnavis10 जुलै : मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या सेना-भाजपकडून आधी नाईट लाईफ आणि आता नाईट मार्केटचा प्रस्ताव पुढे आलाय. मुख्य म्हणजे या दोन्ही प्रस्तावामुळे पुन्हा एकदा सेना भाजप आमने सामने आले आहेत. अशा बाजारूपणावर आपण बोलणार नाही अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये.

सर्वात आधी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने पालिकेत मांडलेला नाईट लाईफचा प्रस्ताव भाजपने धुडकावून लावला, तर आता भाजपच्या नगरसेवकांने मांडलेल्या नाईट मार्केटच्या प्रस्तावावरुन खुद्द सेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच भाजपचा पानउतारा केलाय. या बाजारूपणावर आता बोलण्यासारखं काही नाही. खरंतर नाईट मार्केट म्हणजे नाईट बाजार मांडण्याची वेळ का आली. याचं उत्तर ज्यांनी प्रस्ताव मांडला त्यांनी यांचं उत्तर द्यावं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच त्यांनी नाईट लाईफची जोरदार पाठराखण केली. जर मुंबईत अहोरात्र धावत असेल तर मुंबईकरांच्या सेवेसाठी रात्री हॉटेल्स, मॉल, रेस्टॉरंट सुरू राहिले पाहिजे. जेणे करून मध्यरात्री काही खरेदी अथवा जेवण्याची सोय होऊ शकेल. त्यामुळे मुंबईकरांचा फायदाच होईल असा दावा उद्धव यांनी केला. पण, नाईट मार्केट हे फेरीवाल्यांसाठी सुरू करताय का ? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

भाजपच्या या प्रस्तावाचं पालिकेच्या बैठकांमध्ये काय होईल हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यवेत्याची गरज नाही. मुळात या दोन्ही प्रस्तावांमध्ये फारसा फरक नाहीय. तरी आमचंच खरं हे सांगण्याची सवय लागलेल्या सेना -भाजपला मात्र त्यांचा प्रस्ताव किती योग्य आहे हे सांगण्यात वेळ वाया घालवत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 09:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close