S M L

पाक सिनेमा 'बिन रोए'ला मनसेचा विरोध

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2015 10:38 PM IST

पाक सिनेमा 'बिन रोए'ला मनसेचा विरोध

10 जुलै : 'बिन रोए' या पाकिस्तानी सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केलाय. हा सिनेमा येत्या 17 जुलै रोजी भारतात रिलीज करण्यात येणार होता. मात्र, सिनेमात पाकिस्तानी कलाकार काम करत असल्याने मनसे चित्रपट सेनेनं या सिनेमाच्या भारतातल्या प्रदर्शनावर आक्षेप घेतलाय.

जिंदगी चॅनलवरच्या 'हमसफर' या मालिकेद्वारे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री माहिरा खान ही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे...तिच्याशिवाय अरमिना राणा खान आणि हुमायून सईद यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. भारतात अंदाजे 75 ते 100 स्क्रिन्सवर हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2015 10:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close