S M L

चार वर्षं लोटली पण पुल काही होता होईना !

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2015 01:58 PM IST

चार वर्षं लोटली पण पुल काही होता होईना !

thane kapurwadi11 जुलै : "नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न" याचा प्रत्यय ठाणेकरांना येतोय. ठाण्यात कापुरबावडीजवळ घोडबंदर रोडवरून मुंबईकडे जाण्यासाठी नवा फ्लायओव्हर बांधला. पण त्यात अनेक अडचणी आहेत. सहा वर्षं उलटूनही तो पूर्ण झालेला नाही. जे काम झालंय, त्यात तांत्रिक त्रृटी आहेत. विलंब झाल्यामुळे 131 कोटींचा पुलाचा खर्च आता 151 कोटींवर पोहचलाय.

ठाणे शहराची मुख्य समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आणि यावर मात करण्यासाठी कापुरबावडी येथून पूल निर्माण करण्याचे ठरले असता 2009 रोजी कापुरबावडी ते ठाणे शहर असा पुलाची बांधणी सुरू झाली. हे काम 131 कोटींचे होते. कामाचा कालावधी 18 महिन्यांत पूर्ण करावे असे नमूद होते परंतु ,सहा वर्षांचा कालावधी झाला तरी हा पूल तयार झाला नाही. आता या पुलाचा खर्च 151 कोटींवर पोहचलाय.

या पुलाचे काम 18 महिन्यांत काम पूर्ण झाले पाहिजे होते त्याला चार वर्षं लागली त्यात या पुलाच्या कामाची किंमत ही वाढलीये. पुलाचं काम सुरू म्हणून त्याच्या खाली रस्त्यावरची जागा कमी झालीय. एवढं करून वाहतूक कोंडी होतेच आहे. मग पूल बांधून साधलं काय, आणि तो सुरू कधी करणार हा प्रश्न ठाणेकरांना पडलाय. हा पूल सुरू होत नाही, म्हणून माजीवाडा जंक्शनला मोठ्या प्रमामात ट्रॅफिक कोंडी होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2015 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close