S M L

मुख्यमंत्र्यांचा सहकुटुंब फोटो ट्विट करणारा पोलिसांच्या ताब्यात

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2015 05:25 PM IST

cm usa fake photo11 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौर्‍याबाबत फोटो ट्विट करणार्‍या अजय हातेकर या व्यक्तीला ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अजय हातेकरची केवळ चौकशी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मुंबई आणि नागपूर पोलिसांनी दिलंय.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसतान म्हणजेच 2011 -2012 साली कुटुंबासह गोव्याला फिरायला गेले असतानाचा फोटो ट्विटरवर टाकून राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहे आणि मुख्यमंत्र्यांची परीवारासोबत परदेशी वारी असा चुकीचा मथळा टाकल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

या ट्विटमुळं सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात नाचक्की झाल्याची तक्रार अंधेरीचे संजय पांडे यांनी केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली.

हा फोटो 2 जुलै 2015 रोजी सकाळी 8.30 वा ट्विट केल्याची माहितीही सुभाष खानविलकर यांनी दिली. काही दिवसांपुर्वी या प्रकरणी नागपुरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2015 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close