S M L

पावसाळी अधिवेशन: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 12, 2015 02:47 PM IST

पावसाळी अधिवेशन: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

12 जुलै : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय. विविध मंत्र्यांचे घोटाळे आणि वाद या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकवटलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चहापानावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली.

शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. सरकारमध्ये सामील असलेल्या दोन्ही पक्षातच संवाद नसल्याची टीका त्यांनी शिवसेना भाजपवर केली. शेतकरी अडचणीत असताना सरकारच्या चहापानाला जाणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी चहापानावर बहिष्कार घातलाय. तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लक्ष्य केलं. घोटाळेबाज मंत्र्यांना चौकशी न करता क्लीन चीट मिळते कशी असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2015 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close