S M L

नागपूर जेलमधून फरार झालेल्या एका आरोपीला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Jul 12, 2015 04:43 PM IST

nagpur central jail

12 जुलै : नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र गुप्ता असं या आरोपीचे नाव आहे. आज पोलिसांनी जबलपूरमधून सत्येंद्र उर्फ राहुल राजबहादूर गुप्ता याला अटक केली. त्याच्यावर तब्बल 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

बिसनसिंह रामुलाल उईके, मोहम्मद सुहेल उर्फ शिब्बू, सत्येंद्र उर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, प्रेम उर्फ नेपाली शालीग्राम खत्री, आकाश उर्फ गोलू रज्जुसिंह ठाकूर या आरोपींनी सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्त असतानाही तुरुंगातून पलायन केले होते. याप्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. आता या गुन्ह्याचा सूत्रधार सतेंद्र गुप्ता याला पोलिसांनी अटक केल्याने पाचव्या आरोपींचा शोध लागण्यास मदत होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2015 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close