S M L

अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2015 02:18 PM IST

अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी

jui gadkari13 जुलै : 'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. एका अज्ञात व्यक्तीने जुईला पत्र लिहुन 20 जुलैला जीवे मारण्याची धमकी दिलीये. या प्रकरणी कर्जत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये.

8 जुलैला जुईच्या वाढदिवस होता. त्या दिवशी एका 10 वर्षांच्या मुलाच्या हातून हे धमकीचं पत्र पाठवण्यात आलं होतं. या पत्रात जुईला 20 जुलैला मारण्याची धमकी देण्यात आलीये.

"ही मस्करी समजू नका, जुई कुठे आहे ती आम्हाला माहित आहे. जर पोलिसांत खबर दिली तर घरतल्या सर्व लोकांना मारून टाकणार. आमची दुश्मनी जुईशी आहे, आम्ही जुईला मारणारच" अशी धमकी पत्रात देण्यात आलीये.

या धमकी पत्रामुळे खळबळ उडाली असून जुई गडकरीने कर्जत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीये. हे पत्र कुणी लिहलं कुठून आलं याचा पोलीस शोध घेत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2015 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close