S M L

मॅच फिक्सिंग ठपका, हिकेन शहाचं निलंबन

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2015 05:09 PM IST

मॅच फिक्सिंग ठपका, हिकेन शहाचं निलंबन

13 जुलै : आयपीएलच्या आठव्या हंगामामध्ये मुंबई इंडियनकडून खेळणार्‍या मुंबईचा रणजी खेळाडू हिकेन शहावर बीसीसीआयनं निलंबनाची कारवाई केलीये. आयपीएलच्या आठव्या हंगामात मॅच फिक्स करण्याच्या आरोपावरुन हिकेन शहाचं निलंबन केलं गेलंय.

हिकेन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमकडून खेळतो. बीसीसीआयच्या अँटी करप्शन विभागानं चौकशीअंती हिकेन शहावर फिक्सिंगचा ठपका ठेवला होता. हिकेन शहानं मुंबईचाच प्लेअर प्रवीण तांबेला यावर्षी आयपीएल दरम्यान मॅच फिक्स करण्यासंदर्भात काही ऑफर दिली होती. यानंतर घडलेला प्रकार प्रवीण तांबेनं टीम मॅनेजमेंटला कळवला. त्यानंतर बीसीसीआयनं अँटी करप्शन विभागाची चौकशी नेमली होती. यानंतर आता हिकेन शहाला सर्व प्रकारामधून निलंबित केलं गेलंय. हिकेन शहानं फर्स्ट क्लास करिअरमध्ये मुंबईकडून 37 रणजी मॅच खेळल्या आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2015 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close