S M L

IPL स्पॉट फिक्सिंग : चेन्नई आणि राजस्थानचा आज फैसला

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2015 02:44 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंग : चेन्नई आणि राजस्थानचा आज फैसला

14 जुलै : 2013 साली झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा आज (मंगळवारी) निर्णय येणार आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली न्यायमूर्ती लोढा समिती आज आपला निर्णय देणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे गुरूनाथ मयप्पन, आयपीएलचे माजी सीईओ सुंदर रामन आणि राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा यांचा फैसला आज होईल.

या तिघांवरही स्पॉट फिक्सिंग करणे किंवा त्यात मदत करण्यासह इतरही आरोप आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या टीम्स कायमच्या रद्दही होऊ शकतात. या प्रकरणातील दोषींना शिक्षाही आज सुनावण्यात येणार आहे. असं झालं तर ती भारतीय क्रिकेट इतिहासातली अतिशय मोठी घटना असेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2015 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close