S M L

राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका

1 डिसेंबर राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवनेनेवर पुन्हा तोफ डागली. विधानसभेत अबू आझमी हिंदीतून शपथ घेताना आमचाच मुद्दा म्हणणार्‍या शिवसेनेचा एकही आमदार आझमींच्या विरोधात का बोलला नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. मंगळवारी षण्मुखानंद सभागृहात मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आमदारांनी सभागृहाचा कोणतीहा अपमान केलं नसल्याचं म्हटलं. तसंच भाजपवरही त्यांनी टीका केली. अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेण्यासाठी पत्र दिलं. त्यांनी चिथावणीखोर भाषा केली. मात्र त्यंाच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विधानसभेतील मनसेच्या आमदारांचा राडा, त्यानंतर मनसेच्या चार आमदारांचं झालेलं निलंबन, याविषयी राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2009 11:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2009 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close