S M L

टोलमुक्तीचा तोटा कोण भरणार?, कोर्टाचा सरकारला सवाल

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2015 01:57 PM IST

टोलमुक्तीचा तोटा कोण भरणार?, कोर्टाचा सरकारला सवाल

14 जुलै : मुंबईतल्या सायन-पनवेल महामार्गावर छोट्या गाड्यांना टोलमाफी दिल्याने होणार्‍या नुकसानीविरोधात टोल कंत्राटदार हायकोर्टात गेल्याने हा टोलनाका पुन्हा चर्चेत आलाय. टोलमाफीमुळे होणारा तोटा नेमका कसा भरून काढणार असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय.

महामार्गावरील खारघर टोलनाक्यावर वाहनांना दिलेल्या टोलमुक्तीमुळे टोल कंपनीला कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तयारी राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात दर्शवली. सायन पनवेल टोलवेज कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, अशी तक्रार करणारी याचिका कंपनीने दाखल केलीये. कंपनीने सुमारे 1,300 कोटी रुपयांच्या भांडवलावर टोलनाका सुरू केला. त्यासाठी कर्जही काढले आहे. या टोलनाक्याचा दिवसाचा खर्च सुमारे 12 लाख रुपये आहे, तर टोलवसुली सुमारे नऊ लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. ते भरून काढण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी कंपनीच्या वतीने करण्यात आली. हायकोर्टाने टोल कंत्राटदाराची याचिका दाखल करून घेत टोलमाफीमुळे होणारा तोटा नेमका कसा भरून काढणार असा सवाल राज्य सरकारला केलाय. त्यावर राज्य सरकारने लवकरच बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलंय. पण या निमित्ताने हायकोर्टाने पुन्हा छोट्या वाहनांना दिल्या जाणार्‍या टोलमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं

- सायन- पनवेलचा टोल कंत्राटदार हायकोर्टात

- खारघर टोल नाक्यावरील सवलतीमुळे नुकसान होत असल्याचा दावा

- टोल सवलतीबाबत कोर्टाकडून सरकारला विचारणा

- सरकारी तिजोरीतून टोलमुक्ती कशासाठी?

- छोट्या वाहनांचा टोल सरकारने का भरावा

- हायकोर्टाची सरकारकडे थेट विचारणा

- 2 दिवसांत निर्णय घेण्याचं सरकारकडून आश्वासन

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2015 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close