S M L

महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 14, 2015 10:23 PM IST

महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर

14 जुलै : 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक' आज (मंगळवारी) विधानसभेत मंजूर करण्यात आलं आहे. या कायद्यामुळे एकूण 110 सेवा योग्य वेळेत देणं बंधणकारक असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंबंधी घोषणा केली.

विधेयकावर बोलताना फडणवीस म्हणाले, भ्रष्टाचार टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरणार आहे. या अगोदरच हा कायदा अस्तित्वात यायला पाहिजे होता. दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर झाल्यावर सरकार तातडीने त्यासंदर्भातील नियम तयार करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही नवीन व्यवस्था तयार करण्यात येत असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना ज्या त्रुटी आढळतील त्यामध्ये सुधारणा करायलाही सरकार तयार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

या कायद्याच्या माध्यमातून सुमारे 110 सेवा तुर्तास देण्याचा शासनाचा मनोदय असून, येणार्‍या काळात त्यात आणखी वाढ करण्यात येईल. अनेक सेवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देण्यात येणार असून, त्यासाठी ई-प्लॅटफॉर्म तयार करण्यात येईल.

हा एक ऐतिहासिक कायदा असून, त्यामाध्यमातून भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. प्रशासनात पारदर्शिता येईल आणि नागरिकांना अधिक अधिकार मिळतील. या क्षेत्रात ज्या राज्यात आणि देशांमध्ये चांगल्या सेवा देण्यात येत आहेत, त्याचा सर्वंकष अभ्यास करूनच हा कायदा तयार करण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2015 06:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close