S M L

नाशिक : हर्सुलमध्ये आज 2 गटांमध्ये हाणामारी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 14, 2015 09:14 PM IST

 नाशिक : हर्सुलमध्ये आज 2 गटांमध्ये हाणामारी

14 जुलै : नाशिकमधल्या हर्सुलमध्ये आज 2 गटांमध्ये हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. एका विहिरीमध्ये एका मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर हिंसाचार उसळला. परिसरात सध्या तणावाचं वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

नाशिकच्या पेठ तालुक्यातील हर्सुलमध्ये आज दोन गटात हाणामारी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी लाठीमार केला, मात्र यात एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले.

दरम्यान, यापूर्वी संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. तसंच जमावाने पोलिसांच्या गाडीचीही जाळपोळ केली. सध्या हर्सुलमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2015 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close