S M L

याकूब मेमनला 30 जुलैला फासावर लटकवणार !

Sachin Salve | Updated On: Jul 15, 2015 04:27 PM IST

याकूब मेमनला 30 जुलैला फासावर लटकवणार !

15 जुलै : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो लोकांचा बळी गेलाय. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार दोषी याकूब मेमनला येत्या 30 जुलैला फासावर लटकवण्यात येणार आहे. टाडा कोर्टानेच हा निर्णय दिलाय.

2007 सालीच त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. पण फाशी शिक्षेविरोधात तो राष्ट्रपतींकडे गेल्याने त्याची फाशी लांबली होती. पण, आता राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्याने अखेर त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झालंय.

नागपुरच्या सेंट्रल जेलमध्येच त्याला फाशी दिली जाणार आहे. 30 जुलैला सकाळी 7 वाजता मेमनला फाशी दिली जाईल याबाबत याकूबच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं आहे.

कोण आहे याकूब मेमन

याकूब मेमन हा टायगर मेमनचा सख्खा भाऊ आहे. 1993 बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार टायगर मेमन होता. बॉम्बस्फोटासाठी जे पैसे पुरवण्यात आले होते त्याचा संपूर्ण व्यवहार याकूबने बघितला होता. याकूबच्या माहिम येथील घरी कट रचण्यात आला होता. याच घरी बॉम्बही बनवण्यात आले होते.

बॉम्बस्फोट प्रकरणात याकूबसह एकूण 12 जणांना फाशीची शिक्षा विशेष न्यायलयाने सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने 12 पैकी 11 जणांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप सुनावली आहे.

याकूबची फाशी मात्र सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली होती. यानंतर याकूब मेमनने राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केला होता. आता फेटाळला गेलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2015 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close