S M L

अधिवेशनात मीडियाची मुस्कटदाबीचा प्रयत्न

Sachin Salve | Updated On: Jul 15, 2015 12:46 PM IST

अधिवेशनात मीडियाची मुस्कटदाबीचा प्रयत्न

adhivsean media34315 जुलै : पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फडणवीस सरकारविरोधात मोर्चा उघडल्यामुळे चांगलाच गोंधळ उडालाय. पण, आज अधिवेशनात मीडियाची मुस्कटदाबीचा प्रयत्न झाला.

विरोधकांच्या आंदोलनाचं कव्हरेज करू नये म्हणून मीडियाच्या प्रतिनिथींनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. ही बाब लक्षात येताच विरोधकांना एकच हल्लाबोल केला.

आंदोलनाचं कव्हरेज करू नये यासाठी मीडियाला प्रवेश नाकारला या विरोधात विरोधक संतप्त झालेत. सुरक्षा कर्मचारी आणि विरोधक आमदार यांच्यात बाचाबाचीही झाली. विरोधकांनी माध्यमांची बाजू लावून धरल्यानंतरच सुरक्षारक्षकांनी आंदोलनाच्या चित्रीकरणास परवानगी दिली. पण, यानिमित्ताने सरकारचा हा एक प्रकारचा दडपशाहीचाच प्रकार असल्याचं दिसतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2015 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close