S M L

अधिवेशनाच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 15, 2015 03:08 PM IST

अधिवेशनाच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

15 जुलै : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली आहे. आज (बुधवारी) अधिवेशनाच्या तिसरा दिवशीही विरोधकांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफी आणि गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरून गोंधळ घातला. विधानसभेत विरोधकांनी कामकाजावर पूर्णपणे बहिष्कार टाकला असून विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून विरोधकांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. त्याचबरोबर टाळ वाजवूनही विरोधकांनी सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधून घेतलं. याच मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे विधान परिषदेचं कामकाज एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. जोपर्यंत सरकार कर्जमाफीवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी आडमुठी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधक शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक आहेत. कर्जमाफी देण्याचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला असताना, विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून विरोधक कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. बुधवारीही टाळांच्या गजरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सरकाच्या विरोधात घोषणा दिल्या.

दरम्यान, सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. विरोधकांनी आंदोलनाचं कव्हरेज करू नये यासाठी मिडियाला प्रवेश नाकारला या विरोधात विरोधक संतप्त झालेत. सुरक्षा कर्मचारी आणि विरोधक आमदार यांच्यात बाचाबाचीही झाली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2015 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close