S M L

आक्षेपार्ह मजकूर भोवला, पोलिसांनी केली ग्रुप अॅडमिनला अटक

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2015 11:32 AM IST

आक्षेपार्ह मजकूर भोवला, पोलिसांनी केली ग्रुप अॅडमिनला अटक

16 जुलै : व्हॉट्सऍपवर कधी काय शेअर होईल याचा नेम नाही. त्यातल्या त्यात ग्रुप अॅडमिन हा टिंगलटवाळीसाठी सगळ्यांचा टार्गेटच असतो. पण, ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो अपलोड केल्याप्रकरणी बुलडाण्यात एका व्हॉट्स ग्रुप अॅडमिनसह एकाला शेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

शेगावमधल्या या ग्रुप अॅडमिनच्या ग्रुपमध्ये एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. याप्रकरणी ग्रुप अॅडमिनसह एकाला शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. ग्रुपमधल्याच एकाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली होती. समाजात तेढ निर्माण होईल अश्या आशयाचे फोटो आणि व्हिडिओ क्लीप सलमान डॉन आणि इस्माईल किंग यांनी या ग्रुप मध्ये टाकले होते. त्यावर ग्रुप मधीलच जागरूक शेख सलीम शेख उमर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी ग्रुप अॅडमिनसह एकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2015 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close