S M L

प्रेमात अडसर होतो म्हणून प्रियकराने चिमुरड्याला दिले सिगारेटचे चटके

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2015 06:49 PM IST

प्रेमात अडसर होतो म्हणून प्रियकराने चिमुरड्याला दिले सिगारेटचे चटके

16 जुलै : प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं पण प्रेमसंबंधांमध्ये अडसर येतो म्हणून एका नराधमाने एका चार वर्षांच्या लहान मुलाला चटके दिले आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. सतीश कोटीयन असं या नराधमाचा नाव आहे. या नराधम प्रियकरास विक्रोळी पोलिसांनी अटक केलीये. पीडित मुलावर विक्रोळीच्या महात्मा फुले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

सतीशचं लग्न झालेल्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, पतीला सोडून तीही सतीशसोबत राहत होती. या दोघांनी विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये घरही भाड्यानं घेतलं. सतीश एका खासगी कंपनीत काम करतो. त्यांच्या प्रेमात एक चार वर्षांचा मुलगा अडसर येत होता म्हणून सतीश त्याला रोज मारहाण करीत असे तसंच सिगारेटचे चटके सुद्धा देत असे. ज्यावेळी या मुलाला चटके देत होता त्या वेळी हां मुलगा जोरजोराने ओरडत असे आणि रडत असे. हा प्रकार रोज होत असल्याने सुरुवातील घरगुती वाद समजून शेजार्‍यांनी दुर्लक्ष केलं.

मात्र, या चिमुकल्याचा रडायचा आवाज ऐकून शेजारी असलेल्या मोसेज जोन याने घरी जाऊन बघितलं पण रात्र झाल्याने काहीच न करता आलं नाही. त्यांनी हा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला.त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोजेस आणि त्याच्या मित्रांनी घरात जाऊन पाहिलं असता चार वर्षांचा राजदीपचा हात आणि पाय फॅक्चर असून चेहर्‍यावर चटके दिल्याचे निशाण दिसत होते.

आपल्याला सिगारेटचे चटके सतीशनेच दिले असल्याचं राजदीपने सांगितलं. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. विक्रोळी पोलिसांनी नराधम सतीश कोटीयन आणि राजदीपच्या आईला ताब्यात घेतलं. या मुलावर विक्रोळीच्या महात्मा फुले हॉस्पिटलमधे उपचार सुरू आहे. आरोपी सतीशला बाल अत्याचार कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2015 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close