S M L

सरकार अधिवेशनात दंग ; राज्यात 3 शेतकर्‍यांनी संपवलं आयुष्य !

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2015 02:04 PM IST

farmer16 जुलै : एकीकडे पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांच्या प्रश्नावरुन विरोधकांची आंदोलनं, गोंधळ सुरूच आहे. पण ज्या शेतकर्‍यांसाठी ही आंदोलनं होतायेत त्या शेतकर्‍यांचा मात्र जीव जातोच आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यातल्या तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. यवतमाळ, बुलडाणानंतर आता मनमाडमध्येही कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

अस्मानी संकटातून कसाबसा सावरलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. तिबार पेरणीच संकट आणी बँकेने पिक कर्जाच पुनर्गठन न केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बोठ्बोदन येथील एका शेतकर्‍याने फाशी घेऊन आत्महत्त्या केली . आनंद राठोड अस मृत शेतकर्‍याच नाव आहे. त्याने आपल्या पाच एकर शेतीमध्ये ज्वारी आणि सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, 20 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पावसामुळे पिकं करपून गेली. त्यामुळे आनंद हताश झाले आणि त्यांनी अखेर आपल्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्त्या केली.

तर बुलडाण्यात बँकेनं कर्जालाच नकार दिल्यानं गणेश वाघ यांनी गळफास लावून आत्महत्या केली. बुलडाण्यात तीन दिवसांत तीन आत्महत्या झाल्यात. तर उत्तर महाराष्ट्रातल्या मनमाडमधल्या चांदवडमध्ये रामभाऊआरोटे या शेतकर्‍यानं आत्महत्या केलीये. कर्ज आणि नापिकीपणाला कंटाळून आरोटे यांनी आपलं आयुष्य संपवलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2015 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close