S M L

अजिंठा घाटात ट्रकच्या भीषण अपघातात 4 ठार

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2015 02:40 PM IST

अजिंठा घाटात ट्रकच्या भीषण अपघातात 4 ठार

16 जुलै : औरंगाबादेतील अजिंठा घाटात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर आहेत. आज पहाटे अजिंठा लेणी जवळ असलेल्या घाटात सिमेंट आणि लाकडी बांबूच्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. धडक झाल्या झाल्या दोन्ही ट्रकनी पेट घेतला.

लाकडानं भरलेल्या ट्रक या आगीत जळून खाक झालाय. दोन्ही ट्रकमध्ये असलेल्या तीन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर एक जणाचा रुग्णालयात हलवताना वाटेत मृत्यू झाला. अजूनही तीन जण औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अपघात एवढा भीषण होता की, एकमेकात गुंतलेले ट्रक सोडवताना क्रेनचा वापर करावा लागला. या अपघातामुळे जवळपास दोन तास जळगाव औरंगाबाद रस्ता बंद झाला होता. आता रस्ता सुरळीत सुरू झालाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2015 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close