S M L

सांताक्रुझ परिसरात स्थानिक गुंडांचा महिला पत्रकारांवर हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Jul 16, 2015 07:19 PM IST

सांताक्रुझ परिसरात स्थानिक गुंडांचा महिला पत्रकारांवर हल्ला

16 जुलै : मुंबईच्या सांताक्रुझ भागातील गोळीबार परिसरात झालेल्या सिलेंडर स्फोटाचं कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या मिडिया प्रतिनिधींवर स्थानिक गुंडांनी अश्लिल शिवीगाळ केला. इतकंच नाही तर त्यांनी महिला पत्रकारांची थेट छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.

स्फोटाचे वृत्त समजल्यानंतर एबापी माझा, टीव्ही-9 तसंच अन्य वाहिन्यांचे प्रतिनिधी, प्रिन्ट मिडियाचे पत्रकार आणि छायाचित्रकार घटनास्थळी जमा झाले. सर्व पत्रकार शांतपणे घटनेचे कव्हरेज करत असताना तिथे उपस्थित असलेल्या 5-7 जणांच्या एका टोळक्याने महिला पत्रकारांना अश्लिल शिविगाळ करायला सुरूवात केली. महिला कॅमेरामनजवळचे कॅमेरे हिसकावून घेतले. उपस्थित पत्रकारांनी त्याला आक्षेप घेतला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये टीव्ही-9चे गंभीर जखमी झाले आहेत. तसंच टीव्ही -9च्या महिला कॅमेरामन तसंच एबीपी माझाच्या महिला रिपोर्टरलाही मारहाण करण्यात आली आहे.

दरम्यान याप्रकरणी वाकोला पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केली असून गुंडांना तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2015 07:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close