S M L

चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडेंना हायकोर्टाची नोटीस

Samruddha Bhambure | Updated On: Jul 16, 2015 09:35 PM IST

चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडेंना हायकोर्टाची नोटीस

16 जुलै : चिक्की घोटाळाप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि पंकजा मुंडे यांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीवर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेशही यावेळी कोर्टाने दिले आहेत.

चिक्की घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यासंदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप अहिर यांनी या गैरव्यवहाराचा तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी याचिका दाखल केली आहे.

महिला आणि बालविकास खात्यात एकाच दिवशी 24 आदेश काढून 206 कोटीची कंत्राटं वाटल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर होत आहे. विशेष म्हणजे ही सगळी कंत्राटं तीन लाखांपेक्षा जास्त किंमतीची असतानाही नियमाप्रमाणे ई-टेंडरिंग करण्यात आलेले नव्हते. या मुद्यावरुन विरोधकांनी पंकजा मुंडेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला असून पंकजा मुंडेंनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2015 06:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close