S M L

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला 671 कोटी

3 डिसेंबर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्राकडून 671 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. पण ही मदत मागणीपेक्षा कितीतरी कमी असल्याची खंत व्यक्त होत आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांमधील 221 तालुके हे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या तालुक्यांमधील दुष्काळ निवारणाच्या कामासाठी राज्य सरकारने केंद्राकडे साडे तीन हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन केवळ 671 कोटी रुपयेच मंजूर केले. गेल्या साडे चार महिन्यात दुष्काळी कामांवर राज्य सरकारने 182 कोटी रुपये खर्च केले आहेत. अजूनही दुष्काळ निवारणाची अनेक खोळंबलेली कामं पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून भरीव आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा होती. पण केंद्र सरकारने राज्याच्या हातात मागणीपेक्षा खूप कमी मदत म्हणजेच 671 कोटी रुपयेच ठेवले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2009 11:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2009 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close