S M L

अधिवेशनात आजही कर्जमाफीवर चर्चा, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2015 10:38 AM IST

vidhan sabha 117 जुलै : पावसाळी अधिवेशनात गेल्या चार दिवसांत विरोधकांनी जोरदार आघाडी उघडल्यामुळे कर्जमाफीच्या मुद्यावर भाजपची कोंडी होताना दिसतेय. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर रान उठवलं. इतकंच नाही तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही कर्जमाफीची मागणी केलेली आहे. आजही याच मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे. भाजप सरकार काय भूमिका घेते हे पाहण्याचं ठरणार आहे.

आघाडीचं सरकार असताना शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी मागणारं भाजप आता काय करतंय असा सवाल विरोधकांनी केला. शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आलाय, त्यांना वाचवण्याची गरज असल्याचं मत विरोधकांनी मांडलं. विरोधकांपाठोपाठ आता शिवसेनेनेही पूर्ण कर्जमाफीची मागणी केलीय. प्रसंगी कर्ज घ्या पण कर्जमाफी करा अशी मागणी शिवसेनेचे आमदार उदय सामंत, राजन साळवी यांनी केलीय. आौचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी ही मागणी केलीय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी या चर्चेवर उत्तर देणार आहे. मित्रपक्ष आणि विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी होत असल्याने सरकार काय भूमिका घेतात याकडे लक्ष असणार आहे.

दरम्यान, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर दोन्ही सभागृहांतले आमदार उदासीन होते. विधानसभा आणि परिषदेत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. पण शेतकर्‍यांच्या चर्चेकडे आमदारांनी पाठ फिरवली. तीन दिवसांच्या आंदोलनानंतर विरोधक चर्चेत सहभागी झाले होते पण त्यावेळी दोन्ही सभागृहांत मात्र तुरळक आमदार उपस्थिती दिसत होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2015 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close