S M L

कोल्हापूरमध्येही जळीतकांड, सहा वाहनं जळून खाक

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2015 01:13 PM IST

कोल्हापूरमध्येही जळीतकांड, सहा वाहनं जळून खाक

17 जुलै : पुणे शहरातलं वाहनांचं जळीत कांड ताज असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातही वाहनांचं एक जळीत कांड घडलंय. वारणानगरमध्ये 5 दुचाकी आणि 2 चारचाकी गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. या घटनेत सुमारे 11 लाख रुपयांचं नुकसान झालंय.

वारणानगरमधल्या अभिषेक अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. तर त्याच सुमारास इमारतीच्या आवारामध्ये 2 अनोळखी व्यक्ती दिसल्याचंही प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय. पेट्रोल टाकून या गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करुन ही आग विझवली. पण 4 दुचाकी या आगीमध्ये जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, या इमारत परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं आरोपींपर्यंत पोहोचणं हे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2015 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close