S M L

घरी मांसाहरी जेवण केलं म्हणून नाट्यनिर्मात्याचा कुटुंबियांना मारहाण

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2015 01:50 PM IST

घरी मांसाहरी जेवण केलं म्हणून नाट्यनिर्मात्याचा कुटुंबियांना मारहाण

govind chavan17 जुलै : आपल्या राहत्या घरी मांसाहरी जेवण करतात म्हणून प्रसिद्ध नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याच बिल्डिंगमधील शेजारार्‍यांनी मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.

'यु टर्न', 'कथा','वन रूम किचन' आणि 'मदर्स डे' अशा प्रसिद्ध नाटकांचे निर्माते गोविंद चव्हाण दहिसर पश्चिम येथील बोना व्हेन्चर या इमारतीत आपल्या कुटुंबियांसह राहतात. या इमारतीत 70 ते 80 टक्के गुजराती आणि मारवाडी समाजाची वस्ती आहे. गुरुवारी दुपारी चव्हाण यांच्या घरी मांसाहारी जेवण करतात या संशयावरून शेजारच्यांनी गोविंद चव्हाण यांच्या दारावर नासकी अंडी आणि घाण पाणी टाकले तसंच दरवाज्यावरही लाथा मारल्या. यावेळी गोविंद चव्हाण घरी नव्हते त्यानंतर गोविंद चव्हाण यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी याविरोधात पोलिसात तक्रार करायला गेले असता इमारतीखाली असलेल्या जमावाने त्यांच्या पत्नीला आणि मुलीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि या इमारतीत मांसाहार करायचा नाही असं धमकावलं. या प्रकारानंतर गोविंद चव्हाण यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढचा तपास करतायत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2015 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close