S M L

महाराष्ट्रातल्या पाण्याचा एकही थेंब गुजरातला देणार नाही – मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Jul 17, 2015 06:18 PM IST

महाराष्ट्रातल्या पाण्याचा एकही थेंब गुजरातला देणार नाही – मुख्यमंत्री

17 जुलै : महाराष्ट्राच्या दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचं एक थेंब पाणीही गुजरातला जाऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं.

पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी विधानसभेत दमणगंगाच्या पाण्याचा प्रश्न चांगलाचं गाजला. छगन भुजबळ यांनी दमणगंगा प्रकल्पाचं पाणी गुजरातला दिलं जात असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले.

गुजरातला महाराष्ट्रातील पाण्याचा एक थेंबही देणार नसल्याचे स्पष्ट केलं तसंच तुम्ही दिलेले पाणी आम्ही परत आणले असल्याचा टोला हाणला. याबाबत विरोधकांच्या काही सूचना असतील तर त्यावर विचार करू असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2015 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close