S M L

वर्ध्यात पंधरा दिवसांत पाच शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2015 07:45 PM IST

farmer suicide१८ जुलै : सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीने त्रस्त झालेल्या वर्धा जिल्ह्यातील पाच शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली आहेत. विशेष म्हणजे पंधरा दिवसांत पाच तर साढ़े सहा महिन्यात ६७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच महिन्याला अकरा शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळल्याचे सरकारी अहवालात पुढे आले आहेत.

पवनार येथील शेतकरी मनोहर वाटगुळे याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्याकडे तीन एकर शेती असून त्यावर दीड लाखांचे कर्ज आहे. पाऊस नसल्याने शेती कशी करायची आणि घर कसे चालवायचे या विवंचनेत त्याने गळफास घेतला.

चार शेतकर्‍यांची आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आज वायगाव येथील शेतकर्‍याने पाण्याच्या टाकीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्याकडे पंधरा एकर शेती असून पाच लाखांचे कर्ज आहेत.  एकीकडे अधिवेशनात शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी विरोधक आंदोलन करत आहे तर सत्ताधारी मात्र, कर्जमाफी शक्य नसल्याचं सांगून हातवर केले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2015 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close