S M L

डबेवाल्यांचे डबे महागले, 100 रुपयांची वाढ

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2015 11:03 AM IST

डबेवाल्यांचे डबे महागले, 100 रुपयांची वाढ

20 जुलै : गेली 125 हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणार्‍या डबेवाल्यांनीही आता डब्यामागे दरमहा घसघशीत अशी 100 रुपयांची वाढ केलीय. शिवाय, डब्यात पाण्याची अथवा ताकाची बाटली असल्यास अधिकचे 50 रुपये मोजावे लागणार आहेत. हा निर्णय मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळातर्फे घेण्यात आलाय.

अगोदरच दरमहिना 700 रुपये दर असलेल्या डब्याचे आता 800 रूपये झाले असल्याचे मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितलंय. तसंच डब्यात पाण्याची अथवा ताकाची बाटली असल्यास अधिकचे 50 रुपये आकारण्यात येतील असेही नमूद केले. गेल्या काही वर्षांत मुंबईत अनेक उद्योगांनी डोके वर काढले. मात्र डबेवाल्यांच्या सेवेत खंड पडला नाही. गेल्या वर्षी केवळ 20 ते 30 टक्के वाढ करण्यात आली होती, परंतु मुंबईसारख्या शहरात डबेवाल्यांना एवढ्या कमी उत्पनात भागवणे कठीण जात आहे. मुंबईत जवळपास 5 हजार डबेवाले दिवसाला दोन ते तीन लाख डबे पोहोचवतात. डबेवाल्यांना या सेवेव्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे साधन नसल्यानं महागाईची झळ पोहोचते.त्यामुळे ही वाढ करण्यात आलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2015 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close