S M L

'नच बलिये'त पुन्हा 'जय महाराष्ट्र', अमृता खानविलकर ठरली विजेती

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2015 11:37 PM IST

'नच बलिये'त पुन्हा 'जय महाराष्ट्र', अमृता खानविलकर ठरली विजेती

20 जुलै : 'नच बलिये' या डान्स रिऍलिटी शोच्या सातव्या सीझनमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा या जोडीने बाजी मारलेली आहे. रश्मी-नंदिश, मयुरेश-अजीशा आणि करिष्मा-उपेन यांना मागे टाकत त्यांनी विजेतेपदाची ट्रॉफी पटकावलेली आहे.

महाअंतिम सोहळ्यातही दिमाखदार परफॉर्मन्स सादर करुन अमृता-हिमांशू जोडीने परीक्षकांसह प्रेक्षकांचीही मनं जिंकली. चेतन भगत, प्रीती झिंटा आणि मास्टर मर्झी हे तीनही परीक्षक सुरुवातीपासूनच अमृता आणि हिमांशू या जोडीचे चाहते होतेच.

यापूर्वीसुद्धा मराठमोळी जोडी सचिन आणि सुप्रिया ही मराठमोळी जोडी 'नच बलिए'ची महाविजेती ठरलेली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2015 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close