S M L

एव्हरेस्ट बेसकॅम्पवर नेपाळ सरकारची ग्लोबल वॉर्मिंग चर्चा

4 डिसेंबर ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याकडे जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी नेपाळच्या मंत्रिमंडळाने जगातल्या सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टवर बैठक घेतली. एव्हरेस्टच्या बेस कँपवर सुमारे 17 हजार 192 फूट उंचीवर ही बैठक पार पडली. या बैठकीत नेपाळचे पंतप्रधान माधव कुमार, 20 मंत्री, अधिकारी, आणि पत्रकार हेलिकॉप्टरने कालापत्थर या एव्हरेस्टच्या बेसकँपवर दाखल झाले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे नेपाळचं बदलणारं हवामान, तसंच हिमालयाच्या पर्यावरणावर होणार्‍या विपरीत परिणामांवर या बैठकीत चर्चा झाली. ग्लोबल वॉर्मिंगचा अनिष्ट परिणाम हिमालयातून उगम पावणार्‍या नद्यांवर होणार आहे. त्याचे दुष्परिणाम प्रामुख्याने नेपाळ, पाकिस्तान आणि भारतातला सोसावे लागणार आहेत. मालदीवच्या मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी अशीच ऐतिहासिक बैठक समुद्र तळाशी घेतली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2009 09:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2009 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close