S M L

नाचक्कीनंतर चिक्की वाटप बंद !

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2015 07:29 PM IST

नाचक्कीनंतर चिक्की वाटप बंद !

20 जुलै : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यात चिक्की घोटाळ्यामुळे फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली. अंगणवाड्यातील मुलांना लोह मिळावं यासाठी 113 कोटी खर्चून चिक्की पुरवण्यात आली. पण, चिक्कीमध्ये कुठे लोखंडाचे तुकडे आढळले तर कुठे बुरशी, मुंग्या लागलेल्याचं समोरं आलं. अखेर राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये वाटण्यात येणार्‍या चिक्कीच वाटप बंद करण्यात आलंय. चिक्कीचा दर्जा योग्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर 10 जुलैपासून अंगणवाडींमधलं चिक्की वाटप बंद केल्याची माहिती राज्य शासनं हायकोर्टात दिलीय.

अमरावती जिल्ह्यात टाकरखेडा संभू अंगणवाडीमध्ये राजगीरा चिक्कीत लोखंडी रिंग सापडली होती. तर त्यापूवच् चोपडामध्ये लोखंडी पट्टीही सापडली होती. एवढंच नाहीतर जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधल्या एका अंगणवाडीत राजगिरा चिक्कीमध्ये लोखंडी पट्टी सापडली होती. तर अहमदनगरमध्ये वाळू आणि माती मिश्रीत चिक्की सापडली. विशेष म्हणजे, ही सर्व चिक्की ही सूर्यकांता सहकारी संस्थेने वितरित केलेली आहे. या प्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलीये. या जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं चिक्की निकृष्ट असल्याची माहिती देण्यात आली. याबाबतची पुढची सुनावणी 5 ऑगस्टला होणार आहे. चिक्की वाटपासाठी तब्बल 113 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. राज्य सरकारने अखेर ा चिक्की निकृष्ट असल्याची कबुली दिलीये. पण, आघाडी सरकारच्या काळापासून चिक्की वाटप केलं जात होतं तर मग फडणवीस सरकारने निकृष्ट चिक्की विकण्याचा निर्णय का रेटला असा प्रश्न उपस्थित होतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2015 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close