S M L

ओपन जिमच्या शेजारी 'स्वाभिमान'चा वडापाव स्टॉल

Samruddha Bhambure | Updated On: Jul 21, 2015 01:21 PM IST

ओपन जिमच्या शेजारी 'स्वाभिमान'चा वडापाव स्टॉल

21 जुलै : ओपन जिमवरून आदित्य विरुद्ध नितेश वाद पेटण्याची शक्यता आहे.  मरिन ड्राईव्हवरील ओपन जिमला परवानगी देणार कळल्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिमच्या बाजूला स्वाभिमान वडापावचा स्टॉल टाकण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी विरोध केल्यानंतर स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. याप्रकरणी पोलिसांनी स्वाभिमान संघटनेच्या 7 जणांना ताब्यात घेतलं आहे.

मरिन ड्राईव्हवर शिवसेनेने उभारलेल्या ओपन जीमला बीएमसी परवानगी देणार असल्याचे कळताच नितेश राणे यांनी आक्रमकता वाढवली आहे. महापालिकेला फूटपाथविषयी काळजी नसेल आणि सर्रास नियम डावलून जीम उभारली जात असेल तर वडा स्टॉल का नाही? असा प्रश्न 'स्वाभिमान'कडून विचारला जातो आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 09:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close