S M L

लिकिंग रोड परिसरात दुकानाला भीषण आग

Samruddha Bhambure | Updated On: Jul 21, 2015 01:52 PM IST

लिकिंग रोड परिसरात दुकानाला भीषण आग

21 जुलै : वांद्रे परिसरातील शॉपिंगसाठी प्रसिद्ध असणार्‍या लिकिंग रोडवरील केएफसीजवळच्या एका चप्पलच्या शोरूमला आज भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, अजून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.

लिकिंग रोडवरच्या केएफसीजवळ एका चप्पलच्या शोरूमला शॉक सर्किटमुळे आग लागली. प्लास्टिक आणि चमडय़ाच्या चप्पलांमुळे ही आग झपाटय़ाने पेट घेत असून, सगळीकडे धुराचे लोळ पसरत आहे. त्यात पावसानेही जोर धरल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नेहमीच शॉपिंगसाठी वर्दळ असणार्‍या रोडवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सावधगिरी बाळगण्यासाठी आजूबाजूच्या इमारती आणि दुकानांना खाली करण्यात आलं आहे. सध्या अग्निशामक दलाच्या 12 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close