S M L

'मोदींची तुलना हिटलरशी करणार्‍या महापौरांनी देशाची माफी मागावी'

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2015 06:53 PM IST

'मोदींची तुलना हिटलरशी करणार्‍या महापौरांनी देशाची माफी मागावी'

21 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कामकाज हे हिटलरशाही सारखं आहे असं वक्तव्य करणार्‍या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना चांगलंच महागात पडताना दिसतंय. भाजप नगरसेवकांनी आज (सोमवारी) महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय.

महापौरांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावं नाही तर संपूर्ण भारतीयांची माफी मागावी अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केलीये. या देशातील जनतेनं नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला म्हणून ते पंतप्रधानपदी आहे. त्यांच्याबद्दल असं विधान करणं अत्यंत चुकीचं आहे. आम्ही सोमवारीही आंबेकर यांच्याकडे विचारणा केली होती. पण तरीही त्यांनी यावर उत्तर दिलं नाही म्हणून ठिय्या आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत आंबेकर माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असंही नगरसेवकांनी स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 06:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close