S M L

अखेर चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या-तंबू उभारण्यास कोर्टाची परवानगी

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2015 07:22 PM IST

chandrabhaga21 जुलै : पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या आणि तंबू उभारायला अखेर न्यायालयानं परवानगी दिलीये. वर्षभरातील 20 दिवस चंद्रभागेचं वाळवंट वापरास न्यायालयानं मार्ग मोकळा करून दिलाय. जिल्हाधिकारी मुंडे यांनी धर्मपुरी पालखी तळावर यासंदर्भात घोषणा केली. त्यामुळे वारकर्‍यांनी एकच जल्लोष केलाय.

चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता अबाधित राखण्यासाठी उच्च न्यायालयाने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकर्‍यांच्या राहुट्या आणि तंबू उभारण्यास मज्जाव केलाय. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2014 रोजी न्यायालयाने हे निर्देश दिले होते. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर वारकर्‍यांच्या रूढी परंपरेवर गंडातर आल्याने, वारकर्‍यांनी या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. वारकर्‍यांच्या तगाद्यामुळे राज्य शासनाने न्यायालयात धाव घेवून वारी दरम्यान, आठ दिवसांची तात्पुरती सवलत मिळविली होती. पण, आता न्यायालयाने वारकर्‍यांना दिलासा देत आता 20 दिवसांची सवलत दिलीये. न्यायालयांच्या या निर्णयामुळे वारकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 07:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close