S M L

'ऐलियन' शोधून काढा !, 'त्यांनी' दिली 100 दशलक्ष डॉलर्सची देणगी

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2015 10:52 PM IST

'ऐलियन' शोधून काढा !, 'त्यांनी' दिली 100 दशलक्ष डॉलर्सची देणगी

21 जुलै : परग्रहांवर जीवन आहे का..? हा प्रश्न मानवाला हजारो वर्षांपासून पडलाय, पण त्याचं ठोस उत्तर मिळालं नाहीये. पण आता ते मिळण्याची शक्यता आहे. कारण रशियन अब्जाधीश युरी मिलनर यांनी या शोधमोहिमेसाठी तब्बल 100 दशलक्ष डॉलर्सची घसघशीत देणगी दिलीये.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी याआधीच भाकित व्यक्त केलं होतं की, पृथ्वीप्रमाणेच एखाद्या ग्रहावर जीवनवस्ती नक्कीच आहे, गरज आहे ती नीट शोध घेण्याची. आतापर्यंत हा शोध निधीअभावी नीट घेता येत नव्हता. पण आता या देणगीमुळे 3 मोठ्या, शक्तिशाली दुर्बिणी विकत घेतल्या जाणार आहेत. त्यांच्या मदतीने पृथ्वीच्या आसपासच्या 10 लाख तार्‍यांभोवतीच्या ग्रहांची पाहणी करता येईल. तसंच, परग्रहांवरून कुणी संदेश पाठवत असेल, तर ते ग्रहण करण्याचीही या दुर्बिणींची क्षमता असेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 10:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close