S M L

खाजगी कोचिंग क्लासेसवर यापुढे राज्य सरकारचे नियंत्रण -तावडे

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2015 05:05 PM IST

खाजगी कोचिंग क्लासेसवर यापुढे राज्य सरकारचे नियंत्रण -तावडे

22 जुलै : राज्य सरकारने आता खाजगी कोचिंग क्लासेसविरोधात मोहीम उघडलीये. खाजगी कोचिंग क्लासेसवर यापुढे सरकारचं नियंत्रण येणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीये. तसंच खाजगी कोचिंग क्लासेसच्या जाहिराती, फी आणि दर्जावरही राज्य सरकारचं नियंत्रण असणार आहे असंही तावडेंनी सांगितलं.

दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने दिलेला अहवाल आज (बुधवारी) विधानसभेत मांडण्यात आला. त्यानुसार मुलांच्या वह्यांच्या पानांची संख्या, वह्यांची पुस्तकांची संख्या कमी करण्यावर भर दिलाय. टॅब बाबत विचार सुरू आहे. पण अजून अहवाल यायचा आहे अशी माहितीही तावडे यांनी दिली. यापुढे खाजगी कोचिंग क्लासेसला नियंत्रित करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अंतर्गत त्याची नोंदणी केली जाणार आहे. क्लासेसच्या जाहिरातींवर नियंत्रण आणले जाईल. त्यांच्या शिक्षणाचा दर्जा आणि फी यावरही सरकारचं नियंत्रण असेल असंही तावडे यांनी सांगितलंय. राज्यभरात खाजगी कोचिंग क्लासेसची मोठी संख्या आहे. अनेक क्लासेसकडून विद्यार्थ्यांकडून भरघोस फी लाटली जात असते. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे खाजगी क्लासेसला लगाम लागण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2015 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close