S M L

कसार्‍यातून बेपत्ता झालेल्या मुलाची हत्या, नरबळीचा संशय

Samruddha Bhambure | Updated On: Jul 23, 2015 01:03 PM IST

कसार्‍यातून बेपत्ता झालेल्या मुलाची हत्या, नरबळीचा संशय

 23 जुलै : कसारामधून 2 जुलैपासून बेपत्ता झालेल्या अकरा वषच्य दक्षचा मृतदेह  खडवली नदीपात्रात सापडला. 11 वर्षाच्या निरागस दक्षची हत्या त्याच्या सावत्र आई, मावशी आणि मामीने केल्याचं उघड झालं आहे. इतकंच नव्हे दक्षच्या हत्येमागे नरबळीचा संशय त्याच्या सख्ख्या मामाने व्यक्त केला आहे.

कसारा येथील कोळीवाडा परिसरात राहणारा दक्ष खानझोडे (वय 11 वर्ष) हा 2 जुलैपासून बेपत्ता होता. याबाबत दक्षची सावत्र आईने कल्याण रेल्वे पोलीस स्थानकात खोटी तक्रार दाखल केली होती. दक्ष आसनगाव रेल्वे स्थानकातून हरवल्याचं तिने तक्रारीत म्हटलं होतं. रेल्वे पोलिसांनी याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. याच दरम्यान दक्षचे मामा देविदास यांनी दक्षच्या हरविण्याविषयी संशय व्यक्त केला. तक्रारीत त्यांनी दक्षला त्याच्या सावत्र आईकडून छळ केला जात असल्याचे सांगितले होते.

दक्ष बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्थानकात देऊनही तपास नीट केला जात नसल्याचं त्याच्या मामाचं म्हणणं होतं. त्यानंतर चिंताग्रस्त देविदास यांनी आपल्या काही नातेवाईकांच्या मदतीने दक्षच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं. दक्षची हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही तरी खुनाचा उलगडत गेलेला घटनाक्रम पाहता हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणी सबंधित कसारा आणि कल्याण रेल्वे पोलिस स्थानकात तक्रार दाखल होती. मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि बेपत्ता दक्षचा शोध घेण्यापासून त्याचा मृतदेह शोधण्याचा काम आम्हीच केल्याचा आरोप दक्षच्या नातेवाईकांनी केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2015 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close