S M L

विधानसभेत विनोद तावडे विरोधकांवर भडकले

Samruddha Bhambure | Updated On: Jul 23, 2015 02:52 PM IST

विधानसभेत विनोद तावडे विरोधकांवर भडकले

23 जुलै : विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिक्षण मंत्री विनोद तावडे विरोधकांवर चांगलेच संतापले. राष्ट्रवादीचे सदस्य भास्कर जाधव यांच्या वादग्रस्त टिपण्णीनंतर सत्ताधारी आणि विरोधकामध्ये जोरदार खडाजंगी झाली. जाधव यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप करत सत्ताधार्‍यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. या गोंधळात सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

सांगली जिल्हय़ातील अनुदानित वसतीगृहांला मिळणार्‍या अनुदानाबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यावरून राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी वादग्रस्त टिपण्णी केली. जाधव यांच्या वक्तव्यावर शिक्षणमंत्री तावडे यांनी जोरदार आक्षेप घेतला. जाधव यांनी जातीवाचक शब्द उच्चारल्याचा आरोप करत तावडे आक्रमक झाले. या वेळी सत्ताधारी पक्षाचे सदस्य विरोधकांवर तुटून पडले. सभागृहात अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाल्ल्याने कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2015 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close